उत्तम गलवा कंपनी अपघात प्रकरण: विभाग प्रमुखासह ऑपरेशन मॅनेजवर जखमी कर्मचाऱ्यांनी दाखल केला गुन्हा 

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612435701792,"A":[{"A?":"I","A":54,"B":711.4253320009559,"D":191.74375213761533,"C":57.2947957088377,"F":0.04,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612435701792,"A":[{"A?":"I","A":54,"B":711.4253320009559,"D":191.74375213761533,"C":57.2947957088377,"F":0.04,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":

वर्धा: भूगाव येथील उत्तम गलवा मेटॅलिक कंपनीत मेंटेनन्सच्या कामादरम्यान फरनेस युनिटमध्ये अंगावर गरम कोक ब्रस्ट पडल्याने 38 कामगार भाजले गेले. त्यांच्यावर सावंगी, सेवाग्राम आणि नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात रात्री जखमी कामगाराच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसात या ब्लास्ट फरनेस विभागाचे प्रमुख आणि ऑपरेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेला विभागाचे पमुख के. सुनीलुमार आणि ऑपरेशन मॅनेजर एन.के. जगन्नाथ जबाबदार असल्याचा आरोप जखमी झालेल्यांपैकी एका कामगाराने केला आहे. या प्रकरणात श्रीकांत भावराव पोटदुखे रा. विसापूर. ह. मु. म्हाडा कॉलनी, वर्धा असे तक्रारकर्त्या जखमी कामगाराचे नाव आहे. कामगाराच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कंपनीवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

तक्रारकार्ता आणि इतर कर्मचाऱ्यांसह ब्लास्ट फरनेसमधून गरम राख फावड्याच्या साहाय्याने बाहेर काढत होते. अचानक ब्लास्ट फरनेसमध्ये टयूमरमधून वाफेसह गरम स्वरूपात असलेले कोक ब्रस्ट बाहेर पडले. ते अंगावर पडल्याने 38 कामगार, कर्मचारी भाजले गेले. या घटनेस विभाग प्रमुख आणि ऑपरेशन मॅनेजर जबाबदार असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

कामगार, कर्मचाऱ्यांवर नागपुरात उपचार

या अपघातात 38 कर्मचारी, कामगार होरपळले गेले होते. घटना घडताच 28 जणांना सावंगी (मेघे) तर 10 जणांना सेवाग्राम रुग्णालयात हलविले होते. सावंगी रुग्णालयातून दोन दिवसात जखमींपैकी 13 जणांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे. या व्यतीरिक्‍त काही कामगारांना रुग्णालयातून सुटी होणार होती मात्र, त्यांना रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला कंपनी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

30 डिसेंबरलाच नव्या संचालकांच्या हाती आली कंपनी

उत्तम गॅल्वा कंपनी नुकतीच कंपनीचा इंग्लडमधील लिथिआ कॅपिटल आणि अमेरिकेतील कॅरव्हॉल इन्वहेंस्टर्स यांच्याशी वर्धा स्टील होर्डिंग प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून सौदा झाला. या सौद्यानंतर 30 डिसेंबरला ही कंपनी नव्या संचालकांनी ताब्यात घेतली असली तरी काम सुरळीत सुरू होते. उत्तम गलवा स्टील्स आणि उत्तम गलवा मेटॅलिक या दोन्ही कंपनीने जुलै 2018 मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली होती. यानंतर नव्या कंपनीने व्यवहार करून ती खरेदी केली. हा खरेदी व्यवहार करताना येथे उत्पादन वाढीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातच ही घटना घडल्याने नव्या संचालकांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हा एक अपघात आहे. यात कोण जुना आणि नवा मालक याकडे लक्ष देण्यापेक्षा कंपनीचे लक्ष जखमी कामगारांकडे आहे. त्यांचा नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय त्यांना कंपनीच्या वतीने काही मदत देणे शक्‍य आहे काय या संदर्भात चर्चा सुरू आहे.
- आर. के शर्मा
जनसंपर्क अधिकारी भूगाव जि. वर्धा

जखमी कामगाराने दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या चौकशीअंती दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काही शासकीय विभागाची चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- रेवचंद शिंगणजुडे
ठाणेदार सावंगी (मेघे) लि. वर्धा 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com