esakal | हृदयद्रावक! एकलुता एक मुलगा ऑटोने प्रवाशांना घेऊन गेला, एक फोन वाजला अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

one died in accident in ner of yavatmal

प्रज्वल हा आईवडिलांना एकुलता एक होता. तो ऑटोने प्रवाशांची ने-आण करायचा. मंगळवारी तो घरातून ऑटो घेऊन गेला. काही काळानंतर फोन वाजला अन् सर्वच संपलं.

हृदयद्रावक! एकलुता एक मुलगा ऑटोने प्रवाशांना घेऊन गेला, एक फोन वाजला अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर (जि. यवतमाळ) : अमरावती रोडवरील दोडकी येथे ऑटोच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.2) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रज्ज्वल सुरेश काकडे (वय 25, रा. वटफळा), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

विशेष म्हणजे मृत प्रज्ज्वल हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. ऑटोचा व्यवसाय करून उपजीविका करायचा. दरम्यान, हा अपघात कसा झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, ऑटो ही रोडच्या साईडला, तर डोक्‍याला मार लागून मृत अवस्थेत प्रज्वलचा मृतेदह पडून होता. वटफळी येथे धम्म परिषद सुरू असल्याने ऑटोचा व्यवसाय चालतो. त्यामुळे प्रज्वलही प्रवाशांना ने-आण करीत होता. दरम्यान, त्याचे प्रेतच सापडल्याने ऑटो क्रमांक एम एच 29 व 7644ला कोणत्याही खाणाखुणा नाहीत. मृत प्रज्ज्वल सोबत घटनेच्या वेळी कोण होते, याचाही तपास करण्याची गरज आहे. त्यामुळे या घटनेत घातपाताची शक्‍यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सदर या घटनेचा अधिक तपास ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत खरात, नीलेश शिरसाट, कासम भाई, निरपूर करवाले, भारत पाटील करीत आहेत.