प्रेयसीला डांबले घरात प्रियकरासह सात जणांवर गुन्हा 

अनिल कांबळे
सोमवार, 2 जुलै 2018

नागपूर : प्रेमप्रकरणानंतर लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला तब्बल घरात डांबून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सुमीत ब्रिजेंद्र वैष्णव (32) आणि अनिकेत मदन थूल (24) दोन्ही रा. आनंदनगर, सीताबर्डी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

सुमीत हा कंस्ट्रक्‍शनचे काम करतो. तीन महिन्यांपूर्वी त्याची 21 वर्षीय पीडित तरुणीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तरुणीला विविध ठिकाणी बोलावून अश्‍लिल कृत्य केले. अनेक वेळा हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध निर्माण केले. तरुणीने त्याला लग्नाचा तगादा लावला असता तो टाळाटाळ करू लागला. मात्र, तरुणीने लग्नासाठी त्याच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे तो त्रस्त झाला होता. 

रविवारी दुपारी सुमीतने तरुणीला नरेंद्रनगर येथे भेटण्यासाठी बोलविले. येथे बोलणे बरे नाही असे बोलून तिला आनंदनगर येथील आपल्या घरी आणले. दहा मिनिटात येतो असे सांगून त्याने तिला घरात कोंडले. बाहेरून दार बंद करून त्याने आपल्या नातेवाईकांना बोलविले. नंदकिशोर वैष्णव, सत्यभामा वैष्णव, अतुल वैष्णव, सचिन पाटील, हेमंत मंडल आणि अनिकेत थूल हे घटनास्थळी आले. आरोपींनी तरुणीला अश्‍लिल शिवीगाळ करून 'तू सुमीतचा नाद सोड नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. त्यानंतर सुमितने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने आपल्या वडिलांना फोन करून घटनास्थळी बोलविले. त्यानंतर दोघाही बापलेकांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सुमीत आणि अनिकेत यांना अटक केली. घटनास्थळ सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी हे प्रकरणी सदर पोलिसांकडे पाठविण्यात आले. 

Web Title: FIR against lover and seven others