esakal | कारागृहातून बाहेर येताच आरोपीने फोडले फटाके, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

fir

कारागृहातून बाहेर येताच आरोपीने फोडले फटाके, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपीने जामिनावर सुटका होताच समर्थकांसह कळंब चौकात (kalamb square yavatmal) फटाके फोडत शक्तिप्रदर्शन केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी (yavatmal police) १२ ते १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. (FIR filed against 12 people due to violating corona rules)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

शाज अहेमद नजीर अहेमद (वय ३५ रा. तायडेनगर), रेहान अहेमद (वय २४), सिराज अहेमद (वय ३५), मिर्झा जफर बेग (वय ३१, सर्व रा. समदानी ले-आउट) मोहसिन खान (वय २७, रा. ताजबागनगर) रेहान कश्मिरी (वय २७ रा. कुरेशीपुरा), अकरम अहेमद (वय २५), काल्या पानठेलेवाला (वय २६), शब्बा (वय २५, सर्व रा. कळंब चौक) व इतर तीन ते चार इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गत महिनाभरापूर्वी आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. यादरम्यान अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यात कारागृहात शाज अहेमद नजीर अहेमद हा सुद्घा होता. दरम्यान या गुन्ह्यांमध्ये १६ जुलै २०२१ रोजी त्याची जामिनावर सुटला झाली. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर समर्थकांसह कळंब चौकात एकत्रित येवून सामाजिक अंतराचे पालन न करता फटाके फोडून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबतची माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. सपोनि रामकृष्ण भाकडे यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे.

loading image