असेच सुरु राहिले तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची?..कोविड सेंटर राडाप्रकरणात अखेर गुन्हा दाखल..

FIR filed against people who misbehave at hospital in yavatmal
FIR filed against people who misbehave at hospital in yavatmal
Updated on

दिग्रस (जि. यवतमाळ) :  कोरोनाबाधित रुग्णाला रेफर न करता येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात यावा, असा हट्ट धरत नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात राडा घातल्याची घटना शुक्रवारी (ता.24) रात्री  दिग्रस तालुक्यात घडली होती.  मात्र या घटनेला इतके दिवस होऊनही आतापर्यंत या घटनेत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळे या घटनेचे कुठलेच गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित होतोय. 

शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी अशाप्रकारे शासकीय कामकाजात अडथळा रुग्णाच्या नातेवाइकांनी आणला. कोरोना काळातील ही गंभीर घटना असताना अखेर तीन दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचे पहिले फिर्यादी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राजेश वजिरे, दुसरे फिर्यादी मुख्याधिकारी शेषराव टाले व तिसरे फिर्यादी कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. अभय गोविंदवार आहेत.  

प्रकरण आपल्या अंगलट येईल म्हणून.. 

तीन दिवस राडा घालणारा मोकाट राहिला तर, फिर्याद देणाऱ्या अधिकाऱ्यांचीच उलट तपासणी घेण्यात आली. प्रकरण आपल्या अंगलट येईल, अशी चिन्हे दिसताच गुन्हा नोंदविण्यात आला. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अश्‍लील शिवीगाळ करून लोकांपुढे अपमानीत करणे व जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करणे आदी आरोप तक्रारीत करण्यात आले. रुग्णाच्या नातेवाइकाने राडा घातला, त्यावेळी घटनास्थळी तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोविंदवार, प्रभारी आरोग्य निरीक्षक इरफान खान अमानुल्ला खान आदी उपस्थित होते. त्यांना शिवीगाळ करीत माझ्या वडिलांचा उपचार येथेच करा, असा नको तो हट्ट धरला. 

तहसीलदारांचीच उलट तपासणी 

तहसीलदार वजिरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. एसडीपीओ उदयसिंह चंदेल यांनी रात्री उशिरा तहसीलदार वजिरे यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचीच उलट तपासणी घेतली. मात्र, तालुका दंडाधिकारी या नात्याने त्यांनी गुन्हे नोंदविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली. गुन्हा नोंद होत नसेल, तर कामबंदचा इशारा डॉक्‍टरांचे सहकारी व पालिका कर्मचारी संघटनेने दिला. अखेर मुख्याधिकारी टाले, डॉ. गोविंदवार यांचे जबानी बयाण घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल उशिरा घेण्यात येत असेल, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा प्रश्‍न जनतेतून विचारला जात आहे. 

म्हणे, भावनात्मकतेमुळे घडली घटना 

कोरोनाबाधितावर शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावा लागतो, असा नियम असताना आमच्या रुग्णावर येथेच जमत नसेल तर, खासगी रुग्णालयात उपचार करावे असे म्हणत राडा घालणे, डॉक्‍टरांना अपमानास्पद बोलणे ही गंभीर घटना आहे. त्यामुळे अधिकारी गुन्हा नोंदविण्यासाठी आक्रमक होते तर, नातेसंबंधांमुळे भावनात्मक होऊन असा प्रकार घडला, असे म्हणत राडा घालणाऱ्याला पाठीशी घालण्याचा काहीसा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याची चर्चा आहे.  

 संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com