
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाचवेळी १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांचा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीना पाझर फुटला.
भंडारा : जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी असलेल्या दोन परिचारीकेंविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबीलढूखे, असे दोन्ही आरोपी परिचारिकेंची नावे आहेत.
हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाचवेळी १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांचा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीना पाझर फुटला. त्या मातांचा हा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्र्यापासून तर सर्वजण आले होते. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी समती स्थापन करून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. यामध्ये परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बालके तब्बल २१ मिनिटे धुरामध्ये रडत होती. मात्र, परिचारिकांनी त्यांना बाहेर काढले नाही. त्यामध्येच त्या बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही परिचारिकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलिस करत असल्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली.