ड्रायव्हिंग स्कूलमधूनच बनावट फिटनेस प्रमाणपत्र, आरटीओ कार्यालयासमोर चालायचा गोरखधंदा

fir filed against two people for fake fitness certificate in amravati
fir filed against two people for fake fitness certificate in amravati
Updated on

अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमधूनच पाच हजार रुपयांमध्ये बनावट फिटनेस प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू होता. गुरुवारी (ता. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक योगेश प्रभुदास घुगे (रा. सुंदरलाल चौक) व येथील संगणक ऑपरेटर अंकुश अरविंद गणोरकर या दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट शिक्के तयार करून ते शासकीय कामासाठी वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले, असे गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. 

नितीन भगवंत गाडे (रा. यशोदानगर, अमरावती) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. गाडे यांनी वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असल्यामुळे त्यांनी आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या ज्ञानेश्‍वर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये संपर्क साधला. आवश्‍यक दस्तऐवज दिले. फॉर्म भरून घेतला. त्यासाठी गाडे यांनी ड्रायव्हिंग स्कूल संचालकास तीन हजार रुपये दिले होते. वाहनाचा परवाना काढताना सदर व्यक्ती वाहन चालविण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, त्याला व्याधी नाही, यासाठी फिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागते. गाडे यांनाही तसे प्रमाणपत्र सही शिक्‍क्‍यांनीशी येथून दिले गेले. त्यांना फिटनेस प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे गाडे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चौकशी केली असता, गैरप्रकार उघडकीस आला. येथील संगणक यंत्र, बनावट शिक्के, काही फॉर्म जप्त केले. नितीन गाडे यांच्या तक्रारीवरून ड्रायव्हिंग स्कूल संचालक योगेश घुगे व ऑपरेटर अंकुश गणोरकर या दोघांविरुद्ध गुन्हा  झाला. 

हा घटनाक्रम आरटीओ कार्यालयाच्या बाहेरचा आहे. गाडगेनगर पोलिसांनी बाहेर केलेल्या कारवाईशी या कार्यालयाचा संबंध नाही.
-राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.

बनावट फिटनेस प्रमाणपत्र किती जणांना वाटप केले, यासंदर्भात सखोल चौकशी केली जाईल. आवश्‍यकता भासल्यास अनेकांची चौकशी होईल.
-आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com