अकोल्यात इमारतीला भीषण आग; जिवीतहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

अकोला - शहरातील गांधी रस्त्यावरील झी महासेल, उत्सव संकुलाला आज (सोमवार) सकाळी भीषण आग लागली. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधी रस्त्यावरील उत्सव संकुलातील दुसऱ्या मजल्यापासून आगीला सुरवात झाली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे 9 ते 10 व्यक्तींना आगीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. व्यापारी संकुलातील साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. यामुळे बाजूच्या इमारतींना आगीची झळ पोहचली आहे. 

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Web Title: fire in akola

टॅग्स