esakal | दिग्रस तालुक्‍यातील वेअर हाउसला भीषण आग; तब्बल दोन कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

बोलून बातमी शोधा

null
दिग्रस तालुक्‍यातील वेअर हाउसला भीषण आग; तब्बल दोन कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : दिग्रस-मानोरा रोडवरील रामनगरजवळील वीज महावितरण केंद्रासमोर असलेल्या सेवा वेअर हाउसला गुरुवारी (ता. २९) दुपारी १२ वाजेच्यादरम्यान भीषण आग लागली. गोदामात असलेल्या जवळपास आठ ते दहा व्यापाऱ्यांचा तूर, हरभरा, ढेप, सरकी व कापसाच्या गठाणी आगीत जळून खाक झाल्याने जवळपास दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वेअर हाउसजवळील शेताचे धुरे जाळल्यानेच ही आग लागली असल्याची शंका घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा: नागपुरात फिरती कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू; नितीन गडकरींच्या हस्ते उद्‍घाटन; २४ तासाच देणार अहवाल

दिग्रसचे तहसीलदार राजेश वजिरे, ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता आवश्‍यक त्या सूचना दिल्या. दिग्रस, पुसद, दारव्हा व मानोरा येथील अग्निशमन दलाकडून संयुक्तीकरित्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न वृत्तलिहेस्तोवर सुरू होते.

सेवा वेअर हाउस येथील कन्यका सहकारी बॅंकेने लीजवर घेतले असून या वेअरहाउसमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी माल ठेवला होता. वेअर हाउस जवळ असलेल्या शेतातील कचरा व धुरे जाळणे सुरू होते. धुरे जळणे बंद झाल्यानंतर गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा: कौतुकास्पद! सामान चढवताना अचानक घसरला वृद्धाचा पाय; आरपीएफ जवानानं वाचवला जीव

त्यांनी गोडाऊनमध्ये पाहिले असता आतमधील शेतमालाला आग लागल्याचे दिसताच. संबंधितांना माहिती दिली तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता दिग्रस नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे रौद्ररूप पाहून पुसद, दारव्हा व मानोरा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. पाण्याचा मारा करूनही आग आटोक्‍यात आली नव्हती.

संपादन - अथर्व महांकाळ