बुलडाण्यात घराला आग ; महिलेचा होरपळून मृत्यू

बुलडाण्यात घराला आग ; महिलेचा होरपळून मृत्यू

खामगाव : तालुक्यातील अकोली येथे २७ सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास आगीत जळालेल्या घरासह एका महिलेचा अक्षरश: कोळसा झालेला मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. पती-पत्नीत नेहमीच खटके उडत असल्याने पतीनेच घातपात केला असावा अथवा छळाला कंटाळून महिलेने जाळून घेतले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.  

इंदूबाई दादाराव पातोडे (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. इंदूबाई व तिचा पती दादाराव पातोडे यांच्यात नेहमीच वाद होत होता. त्यांना सहावर्षीय मुलगी व चार वर्षीय मुलगा आहे. त्यांच्यात उडणारे खटके महिला तक्रार निवारण केंद्रापर्यंत गेले होते. वस्तीपासून काही अंतरावर त्यांचे टीनपत्र्यांचे एकमेव घर होते. दरम्यान, २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता घर पूर्णत: जळालेल्या अवस्थेत दिसून आले. तसेच लोखंडी खाटेजवळ महिलेचा अक्षरश: कोळसा झालेला मृतदेह आढळून आला. कवटी, धड आणि हातापायाच्या अस्थीच उरलेल्या दिसत होत्या. घटना घडली त्यावेळी दोन्ही मुले विवाहितेच्या सासुकडे गेलेली होती. 

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार आशिष लव्हंगळे, जमादार रतन जंजाळ, अमोल जाधव, रवींद्र गायकवाड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिलेच्या हाडांचे नमुने तपासणीकरिता अमरावती येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले आहे. इंदुबाईची आई कांताबाई मधुकर खंडारे (५५, रा. हिवरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असलीतरी इंदुबाईचा घातपात झाल्याचा संशय असल्याने पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com