वनव्यावर नियंत्रणासाठी अकादमी - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - जंगलातील आगी आणि वनव्याने निसर्गाचे मोठे नुकसान होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन अकादमी स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर - जंगलातील आगी आणि वनव्याने निसर्गाचे मोठे नुकसान होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन अकादमी स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यस्तरीय आपत्ती निवारण यंत्रणेप्रमाणे अकादमी उभारली जाईल. आग लागताच त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम याच्या माध्यमातून होईल. आधी हजार बाय हजार चौरस मीटरमध्ये लागलेल्या आगीचीच नोंद करण्यात येत होती. यामुळे छोट्या आगीकडे कुणाचेच लक्ष नसते. त्यामुळे यावर नियंत्रणाबाबत काहीच करण्यात येत नव्हते. मात्र आता ३०० बाय ३०० मीटरच्या क्षेत्रात लागणाऱ्या आगीचीही नोंद होणार आहे. वन अकादमीच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होईल. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्रीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जयचंदची चौकशी
वाघाचे क्षेत्र १२ बाय १२ चौरस किमीचे असते. एका मर्यादेनंतर तो आपले क्षेत्र बदलतो. जयचंद इतर क्षेत्रात जाण्याची शक्‍यता आहे. त्याचा तपास सुरू आहे. काळ्या बिबटसंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. 

‘वाघा’चे संवर्धन करायचेच आहे!  
शिवसेनेसोबतच्या युतीवर प्रश्‍न विचारण्यात आला असता मुनगंटीवार यांनी वाघाचे संवर्धन करायचे आहे, असे गमतीने सांगून युती होईल, अशी आशा व्यक्‍त केली. वाघाचे संवर्धन होईलच. थोडा वेळ लागेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

वृक्ष संगोपनाचे व्हिडिओ शुटिंग
राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून नागपूर विभागासाठी साडेपाच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी ८० टक्‍क्‍यांवर वृक्ष जिवंत आहेत. गेल्या दोन वर्षांत २७३ चौरस किमी वनेतर क्षेत्र तयार करण्यात आले असून याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. वृक्षलागवड लोकचळवळ करण्यासाठी ग्रीन आर्मी तयार करण्यात आली आहे. वृक्षलागवडीच्या कामात अधिक पारदर्शकता यावी, यासाठी वृक्षलागवडीसह त्याच्या संगोपनाचीही व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. कुणालाही याबाबत शंका असल्यास १९२६ क्रमांकाच्या टोलफ्रीवर माहिती देता येईल.

Web Title: fire control academy sudhir mungantiwar