फेटरी आश्रमाच्या साधकावर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - फेटरी येथील आसाराम बापूंच्या आश्रमातील संपत्तीच्या वादातून एका साधकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे आश्रमातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. 

आसाराम बापूंच्या साधकांचा फेटरी येथे भव्य आश्रम परिसर आहे. मात्र, या संपत्तीचा दुरुपयोग होत असल्याच्या कारणावरून 2007 मध्येच साधकांमध्ये दुफळी निर्माण झाली. अंतर्गत वाद सुरू असला तरी तो पुढे आला नव्हता. मात्र, आसाराम बापूंना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर वाद विकोपाला जाऊन दोन गट समारोसमोर आले. आश्रमाचे विश्‍वस्त आणि एक गट संपत्तीचा दुरुपयोग करीत असल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप आहे. 

भारतमाता चौक, इतवारी येथील रहिवासी राहुल जोशी (वय 29) हे दुसऱ्या गटातील साधक आहेत. आश्रमातील मालमत्तेचे रक्षण केवळ साधक करतील असे जोशी गटाचे म्हणणे होते. तर आसारामबापू यांची केस लढविण्यासाठी प्रसिद्ध वकील नेमण्यात यावा, असा दुसऱ्या गटाचा आग्रह आहे. जोशी यांचा या आग्रहाला विरोध असल्याची माहिती आहे. याच कारणावरून झालेल्या वादानंतर यापूर्वी जोशी यांना मारहाणही झाली होती. जोशी यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आला आहे. 

वाहनाची काच फुटली 
14 जानेवारीला रात्री जोशी चारचाकीने गोरेवाडा रिंगरोडने जात असताना मुनीत उर्फ पीयूष व त्याचे साथीदार दुसऱ्या चारचाकी वाहनाने मागाहून आले. त्यांनी जोशी यांच्या वाहनाला ओव्हरटेक करीत अचानक रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात जोशी यांच्या वाहनाची काच फुटली. पण, ते थोडक्‍यात बचावले.

Web Title: Fire on Fetter Ashram seeker