गोंदियात हॉटेलला आग; पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

आग धुमसत असताना काही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील इमातीवर शिडी टाकून वाचविले. बचावकार्य सुरु असून, हॉटेलचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोंदिया - शहरातील गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझा या हॉटेलला आज (बुधवार) सकाळी सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेलाल चौकात बिंदल प्लाझा हे हॉटेल असून, याठिकाणी लॉजिंगची सोय आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. याठिकाणी काम करत असलेल्या पाच कामगारांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आग धुमसत असताना काही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील इमातीवर शिडी टाकून वाचविले. बचावकार्य सुरु असून, हॉटेलचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Fire in Gondia hotel, five died