विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला आग

Fire in Vidarbha Konkan Rural Bank
Fire in Vidarbha Konkan Rural Bank

अकोला : मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तर काही महत्त्वाचे दस्ताऐवजही जळाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात मलकापूरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या अंबिकानगर शाखेत बँकेचे दैनंदिन कामकाज सुरू होते. 

सर्वकाही नेहमी प्रमाणे सुरू असताना दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास अचानाक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. बँक अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाची संपर्क साधला. अग्निशम विभागाच्या दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. बाहेरून आग कमी दिसत असली, तरी आतुन मात्र आगीचे स्वरुप भीषण होते. अग्निशमन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली; मात्र आगीत तब्बल साडेतील लाख रूपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. शिवाय, बँकेतील महत्त्वाचे दस्ताऐवजही या आगीत स्वाहा झाल्याने बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

आग लागण्याचे कारण स्पष्ट नाही
बँकेला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. परंतु, घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com