esakal | मेळघाटात पाच बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती, बालकांच्या आरोग्याची घेणार काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

मेळघाटात पाच बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती, बालकांच्या आरोग्याची घेणार काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अचलपूर (अमरावती) : बालमृत्यू (child mortality) , कुपोषण, अंधश्रद्धेतून भूमकाच्या दारी जाणारे लोक हे रोखण्यासाठी मेळघाटात आरोग्य यंत्रणा (health system in melghat) मजबूत करणे आवश्यक आहे. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे आजार डोके वर काढतात, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो परिणामी पावसाळ्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढते. यावर आळा बसावा म्हणून पावसाळ्यात मेळघाटातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. (five child specialist doctors appointed in melghat)

हेही वाचा: तिरोड्याच्या माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, देशमुखांची घरवापसी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट म्हणजे गैरसोयींचे आगार. निसर्गाने भरभरून दिलेल्या या प्रदेशाला आदिवासींच्या बालमृत्यूंचा शाप आहे. सरकारने कितीही व्यवस्थेचा दावा केला तरी वर्षअखेरीचे आकडे अंगावर येतात. येथे वैद्यकीय सोयींची वानवा आहे. नीट रस्ते नाहीत, हव्या तेवढ्या रुग्णवाहिका नाहीत. सरकारी दवाखाने असलेच तरी तज्ज्ञ डॉक्टरांची सोय नाही. संपूर्ण मेळघाटात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ नाहीत. आदिवासींच्या बकाल वस्त्या आणि त्या अनुषंगाने वाढलेले कुपोषण हे नित्याचे समीकरण बनले आहे. मागील वीस वर्षांत मेळघाटात मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या दहा हजारांवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारी पहिली की अंगावर काटा येतो. येथे बालमृत्यूचा दर देशाच्या सरासरीपेक्षा मोठा आहे. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मेळघाटातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांना आपल्या आरोग्य केंद्रांतर्गत कार्यक्षेत्रातील बालकांची तपासणी करून औषधोपचार करावा लागणार आहे, तसेच गंभीर आजाराच्या बालकांना शोधून संदर्भित करावे लागणार आहे. यामध्ये मेळघाटातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शैलेश गोफने, साद्रावाडी केंद्रात डॉ. अजिंक्य सूर्यवंशी, कळमखार केंद्रासाठी डॉ. अभिजित गारवाल, टेंब्रुसोंडा केंद्रासाठी डॉ. अमोल नाफडे, बिजुधावडी केंद्रात डॉ. वैभव पांचाळ या पाच बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पाचही डॉक्टर बालकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

loading image