esakal | अमरावती अन् कोरोना; रुग्णांची संख्या काही कमी होईना, रोज होते इतकी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

five corona positive found in amravati on Monday

विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. नागपुरात तर हजाराचा आकडा पार करण्यासाठी काहीच रुग्णांची गरज आहे. अशीच स्थिती अकोला जिल्ह्याचीही आहे. अकोल्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत नागपुरात मात्र मृत बाधितांचा आकडा कमी आहे. असे असले तरी चिंता काही कमी नाही. 

अमरावती अन् कोरोना; रुग्णांची संख्या काही कमी होईना, रोज होते इतकी वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विदर्भात नागपूर व अकोला कोरोना रुग्णांमध्ये आघाडीवर आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रोज रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात सोमवारी पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 343 झाली आहे. कमी प्रमाणातच का होईना रुग्ण वाढणे सुरूच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

एसआरपीएफ कॅम्प येथील 35 वर्षीय दोन पुरुष, मच्छिसाथ येथील 63 वर्षीय पुरुष, कमीला ग्राउंड येथील 30 वर्षीय पुरुष तसेच संत गाडगेनगर कोविड सेंटर वलगाव येथील 47 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 343 झाली आहे.

सविस्तर वाचा - बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

इंद्रभुवन थिएटर, गरबा चौक परिसर महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील एक 39 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नागपूर येथील ध्रुव लॅबने दिला आहे. संबंधित महिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. कोविड सेंटर, वलगाव असा पत्ता दर्शविलेली व्यक्ती मूळची चांदूर बाजार येथील आहे. चांदुर बाजार येथे यापूर्वी आढळलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील ही व्यक्ती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. नागपुरात तर हजाराचा आकडा पार करण्यासाठी काहीच रुग्णांची गरज आहे. अशीच स्थिती अकोला जिल्ह्याचीही आहे. अकोल्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत नागपुरात मात्र मृत बाधितांचा आकडा कमी आहे. असे असले तरी चिंता काही कमी नाही.

असे का घडले? - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

चिंता काही कमी होईना

अमरावतीतही दररोज सात ते आठ रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काही संपलेली नाही. मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचा हा आकडा कायमच आहे. अनेक उपाययोजन सुरू असतानाही रुग्ण वाढत असल्याने ताण कायमच आहे. रविवारचा दिवस उजाळत नाही तोच नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सोमवारी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.