बुलडाण्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. मेहकर तालुक्याच्या अंजनी येथील हे सर्व रहिवासी आहेत. 

बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्याजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व सदस्य हे मध्यप्रदेश येथील महू येथे गेले होते.

मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. मेहकर तालुक्याच्या अंजनी येथील हे सर्व रहिवासी आहेत. 

मेहेकर तालुक्यातील अंजनी येथील 10 जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गावी मध्यप्रदेश मधील महू या गावी दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मूळ गाव केवळ 1 किमी अंतर असताना त्यांच्यावर काळाने घाव घातला. ट्रकने स्कॉर्पिओला चिरडले व त्यातील पाच जण जागीच ठार झाले. पाच जण गंभीर जख्मी झाले असून त्याना मेहेकर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: five dead in accident near Buldhana

टॅग्स