वर्धा: पुलगावमधील लष्करी तळाजवळ स्फोट; 6 जण ठार (व्हिडीओ)

Wardha
Wardha

वर्धा : वर्धा शहराजवळी पुलगाव येथील लष्करी तळाजवळ आज (मंगळवार) पहाटे जुनी स्फोटके निकामी करताना झालेल्या भीषण स्फोटात 6 जण ठार झाले असून, 11 जण जखमी आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. पहाटे 7.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या स्फोटाबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या स्फोटात जखमी झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटात मृत्यू व जखमी झालेले कर्मचारी जबलपूरच्या खरमिया ऑर्डिनन्स फॅक्टरीतले असल्याची माहिती मिळत आहे. स्फोट हे जिथे बॉम्ब नेहमी निकामी करतात तिथे सोनेगाव आबाजी या ठिकाणी झाले आहेत. मृतांमध्ये प्रभाकर वानखेडे, राजकुमार भोवते, विलास पचारे, नारायण पचारे, प्रवीण मुंजेवार यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com