कुटुंबासह कर्तव्यावर जात होता सीआरपीएफ जवान, पण वरखेड फाट्यावर गाडी पोहोचताच झाला चुराडा

प्रशिक मकेश्वर
Monday, 25 January 2021

सीआरपीएफ जवान अरुण रामदास साळवे कुटुंबासह औरंगाबाद येथून नागपूर येथे कर्तव्यावर आपल्या चारचाकीने जात होता.

तिवसा (जि. अमरावती) : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरखेड फाट्यानजीक भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातातील कारमधील जखमी नागपूर येथे एसआरपीएफ जवान असून तो कुटुंबासह कर्तव्यावर जात होता.

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

या अपघातात कारमधील अरुण रामदास सावळे (वय३०)रेखा अरुण सावळे (वय२८), स्नेहल अरुण सावळे (दीड वर्ष) रा.सर्व औरंगाबाद, तर दुचाकी चालक गोकुल गुलाब डाहे  (२५वर्ष) रा.अंतोरा व बाळू बापूराव बारबुद्धे  (वय४०)रा. वाढोना असे जखमींचे नवे आहेत. सीआरपीएफ जवान अरुण रामदास साळवे कुटुंबासह औरंगाबाद येथून नागपूर येथे कर्तव्यावर आपल्या चारचाकीने जात होता. दरम्यान, अंतोरा येथून दुचाकीने चारचाकीला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, सदर कारने तब्बल चार ते पाच वेळा पलटली. यामुळे या कार मधील तीन जण व दुचाकीवरील दोघे, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'

अपघातात मात्र कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमींना तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर कारमधील जखमींना नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. तिवसा पोलिसांमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक रिता उईके करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five injured in two wheeler and car accident in teosa of amravati