पाच लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर : जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नारी भागात अवैध पद्धतीने दारूतस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे छापा टाकली असता महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.31 बीबी 6586) यामध्ये मध्य प्रदेश राज्य निर्मित व तेथे विक्रीकरिता असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला उच्च प्रतीच्या ब्रॅण्डचे 750 मिलिच्या रेड लेबल, ब्लेंडर प्राईड, रॉयल चॅलेंज व्हिस्की तसेच वोडका या ब्रॅन्डच्या 72 सिलबंद बाटल्या मिळाल्या. याची किंमत 5,03,110 रुपयांची असल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakhs of alcoholic beverages were seized