लाहोरीच्या शर्मासह पाच जणांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर - गोकुळपेठ येथील लाहोरी बारजवळील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बारमालक समीर शर्मासह पाच जणांना जिल्हा न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागपूर - गोकुळपेठ येथील लाहोरी बारजवळील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बारमालक समीर शर्मासह पाच जणांना जिल्हा न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 मोठी लाहोरी बारमध्ये १३ नोव्हेंबरच्या रात्री तरुणीची छेड काढल्यावरून गोळीबार करण्यात आला होता. पवन दयाराम चौधरी याच्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलिसांनी बार संचालक समीर प्रल्हाद शर्मा (३२, रा. मायासदन इंदोरा) याच्यासह, राकेश गुलाबराव सामुद्रवार (२६, रा. झिंगाबाई टाकळी), श्रीकांत आनंदराव वनवे (२६, रा. लॉ कॉलेज चौक), अभिषेक आशुतोष सिंग (२५, रा. गिरीपेठ लॉ कॉलेज), शुभम प्रफुल्ल जयस्वाल (२५, रा. यशवंतनगर) या आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. शनिवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना तीन दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे. समीर शर्मातर्फे ॲड. आयुष शर्मा यांनी युक्तीवाद केला.

Web Title: Five others arrested with Lahore Sharma