Accident : दुचाकीसमोर हरीण आल्याने दाम्पत्यासह पाच गंभीर

कारंजालाड मार्गावरील म्हसला फाट्यावर अपघातात दाम्पत्यासह तीन चिमुकले, असे एकूण पाच जण जखमी झाले.
accident
accidentesakal

अमरावती - वाशीम जिल्ह्यातील कारंजालाड गावाजवळील म्हसला फाट्यावर दुचाकीसमोर हरीण आडवे आले, त्यात दाम्पत्यासह तीन चिमुकले, असे एकूण पाच जण जखमी झाले. अपघातातील पाचही जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संजू परते (वय ३५), सरस्वती परते (वय २९), रसिका परते (वय ९), रविराज परते (वय ४) व नीरवा परते (वय-दीड वर्षे), अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. संजू परते यांची दोन मुले ही मंगरूळपीर येथील आश्रमशाळेत शिकायला आहेत. दिवाळी असल्याने त्यांना घेण्यासाठी ते मध्य प्रदेशच्या दोडा-पोकर्णा गावातून मंगरूळपीर येथे आले होते. तेथून ते पत्नी व तीन लहान चिमुकल्यांसह एकाच दुचाकीने गावाकडे जात होते.

म्हसला फाट्यावर रस्त्यात अचानक एक हरीण दुचाकीच्या समोर आडवे आले. त्यामुळे पाच जणांना घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. अपघातात एकूण पाच जण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हरीण आडवे आल्याने हा अपघात झाला, असे जखमी दुचाकीस्वार संजू परते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com