चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.

नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (ता. शिंदेवाही) येथे 21 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती. 25 वर्षीय एक तरुण फोनवर बोलत असताना सविता विनोद मोहुर्ले (30) ही महिला समोरून जात होती. त्या तरुणाने फोनवरील व्यक्तीला "दारूचा पैसा होय...' हे वाक्‍य म्हटले. हे वाक्‍य आपल्यालाच उद्देशून म्हटल्याचा गैरसमज महिलेचा झाला. तिने रागाच्या भरात तरुणाच्या कानशिलात लावली. हा अपमान सहन न झाल्याने तरुणाने त्याच दिवशी सायंकाळी आपल्या राहत्या घरी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली होती. शिंदेवाही पोलिसांनी सविता मोहुर्ले यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. सुमारे पंधरा दिवस ती पोलिस कोठडीत होती. महिलेचा जामीनसुद्धा न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळला होता. तसेच तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती. त्यानंतर, महिलेने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. "चापट मारणे म्हणजे आत्महत्येस चिथावणी किवा प्रेरित केले' असे होऊ शकत नाही. त्यामुळे, महिला निर्दोष असल्याची बाजू ऍड. टी. जी. बन्सोड यांनी उच्च न्यायालयासमोर मांडली. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख, न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी हा युक्तिवाद मान्य केला. तसेच महिलेची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे एस. डी. शिरपूरकर यांनी बाजू मांडली. महिलेतर्फे ऍड. टी. जी. बन्सोड यांनी बाजू मांडली.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flattening is a suicide Not motivating