लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेले खांब

File photo
File photo

अमरावती : ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, वाकलेले खांब आणि त्यामुळे होत असलेले अपघात या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
वादळी वारा, पुरामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असून खांबसुद्धा वाकले आहेत. अनेक ठिकाणी तर झाडे हे खांबापेक्षा उंच वाढले आहेत. लोंबकळणाऱ्या तारांचा स्पर्श झाल्याने आतापर्यंत अनेक शेतकरी तसेच मुक्‍या जनावरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र तरीसुद्धा वीज वितरण कंपनीकडून कुठल्याच प्रकारची काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी सभेत केला. या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब सुद्धा विचारला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याकारणाने या सभेत कुठलाही ठराव घेण्यात आला नाही. सभेला सदस्य पूजा हाडोळे, अनिता मेश्राम आदींसह अन्य उपस्थित होते.
माईकची घरघर सुरूच
जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये अडथळा ठरणारे सदोष माईक या सभेतसुद्धा डोकेदुखी ठरले. स्पष्ट आवाज नसणे किंवा मध्येच आवाज मोठा होणे, या सारख्या तक्रारी दर सभेमध्ये करण्यात येतात. मात्र अद्यापही जुनी ध्वनिक्षेपक यंत्रणा बदलविण्यात आली नाही. पदाधिकाऱ्यांकडून यावर तीव्र नाराजीसुद्धा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर कॉर्डलेस माईकच्या साहाय्याने उर्वरित सभा पार पाडण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com