नांदनदीच्या पुरात जनावरे गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

उमरेड : तालुक्‍याला पावसाने झोडपून काढल्याने नांदनदीला आलेल्या पुरात अनेक जनावरे वाहून गेली. लोअर वणाचे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड-हिंगणघाट व बेला मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 856.53 मि.मी. पावसाची नोंद उमरेडमध्ये झाली आहे.

संततधार पावसामुळे नांद नदीवरील लोअर वणा जलाशयाचे सर्व सातही दरवारे उघडण्यात आले आहेत. यामुळे बेला-सिर्सीसह आसपासच्या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली आला आहे. यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना पुन्हा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांना पुरामुळे घरी पोचता आले नाही. पिपळा येथील एव्हिएट न्युट्रिशन सर्व्हिसेसमध्ये पुन्हा पाणी शिरले असल्याची माहिती संचालक प्रदीप हिंगे यांनी दिली. तालुक्‍यातील पाचगाव मंडळातही संततधार पावसामुळे हळदगाव येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. मकरधोकडा येथील जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे.
नांद नदीत अंदाजे 20 ते 25 गायी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असाव्यात, अशी माहिती जनावरांच्या मालकांनी दिली. तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटल्यामुळे बचावकार्यात विलंब होत आहे. सततच्या पावसाने ओढावलेल्या पूरपरिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood