
तापाने फनफनलेल्या मुलाला उपचारासाठी भर पुरातून गेला...
गोंडपिपरी : चिमुकल्या मुलाला ताप आहे.ताप वाढल्याने कुटुंबियांची चिंता वाढली.गावात ना दवाखाना,नाही डाँक्टर.दुसरीकडे वर्धेला आलेल्या महापुराने जिकडेतिकडे पाणीच पाणी.मुलाची अवस्था बघता बापाने मुलाला खांद्यावर घेतले अन पुरातूनच तो उपचारासाठी निघाला.बापाच्या विशाल काळजाची अनुभुती दर्शविणारा हा थरार आज पोडसावासीयांनी अनुभवला.
गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस आहे.सततच्या पावसाने सामान्य जिवनमान अस्त्यवस्त झालय.पावसाने विठ्ठलवाड्यात एका चिमुकलीला जिव गमवावा लागला होता. सतंतधाराने वर्धा नदीला महापूर आला.राज्याच्या सिमेला जोडणार्या पोडसा पुल पाण्याखाली आला,अन,सःपर्क तुटला.
महापुराने गावाला वेढल.सर्वदूर पाणीच पाणी.
महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे.वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे.गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्या मुलगा कार्तिक याला ताप आला.तापाने तो फणफणत होता.गावात आरोग्य सूविधा नाही.दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले.मात्र बाप तो बाप.मुलाचा ताप काळजी वाढविणारा ठरला.
पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी.अंतरावर वेडगाव गाव आहे.येथे खाजगी डाॕक्टर आहेत.मुलाला खांद्यावर वर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढीत गेला.मुलावर उपचार केला अन परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे गेला.
पुरान सामान्य जिवन पुरत बिघडलय.अशावेळी मुलाच्या उपचारासाठी बापाला भरपुरातून जावे लागले.हा प्रसंग बघतांना अनेकांच्या डोळ्यात आसवांचा पूर आला
Web Title: Flood River Wardha Father Great Concern
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..