गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती; घरात पाणी शिरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

गडचिरोली : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात सोमवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. चार मार्ग बंद झाले आहेत.
रात्रीपासून पाऊस पडत असल्याने गडचिरोली शहरातील अनेक वॉर्डामध्ये पाणी शिरले आहे. नगर परिषद कार्यालयाच्या आवारालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कन्नमवार वॉर्ड, विवेकानंदनगर इत्यादी सखल भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. चामोर्शी रस्त्यावरील केमिस्ट भवनजवळ पाणी साचल्याने वाहतूक बंद होती.

मागील 24 तासांत गडचिरोली तालुक्‍यात सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल आरमोरी तालुक्‍यात 99.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 435 क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्‍यातील चिचडोह प्रकल्पाचे 38 दरवाजे उघडून 2243.53 क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. नाल्यांना पूर आल्याने गडचिरोली तालुक्‍यातील गोगाव-दिभना, धानोरा तालुक्‍यातील येरकड-मालेवाडा, कुरखेडा तालुक्‍यातील कढोली-वैरागड व आरमोरी तालुक्‍यातील वैरागड-विहीरगाव हे मार्ग बंद आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Gadchiroli district; Water entered the house