पुरामुळे गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला

 गडचिरोली : एटापल्लीजवळील पुलावरून वाहत असलेले पाणी.
गडचिरोली : एटापल्लीजवळील पुलावरून वाहत असलेले पाणी.

गडचिरोली : जिल्ह्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जवळपास 300 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या पुराचा अहेरी उपविभागातील गावांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक मार्गांची वाहतूक शुक्रवारी दिवसभर बंद होती. गुरुवारी (ता.22) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारपर्यंत सुरूच होता. संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com