esakal | धक्कादायक! यवतमाळात पाण्याच्या ६५० स्त्रोतांत फ्लोराईड, ८७६ स्त्रोत पिण्यासाठी अयोग्य
sakal

बोलून बातमी शोधा

fluoride found in 650 water source in yavatmal

जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची दोन टप्प्यांत तपासणी केली जाते. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूननंतर पाणी नमुने घेतले जातात. स्त्रोतांनुसार विविध रंग देण्यात येतो. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतांमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, फी, टर्ब आदी स्वरूपाचे प्रमाण आढळून येते.

धक्कादायक! यवतमाळात पाण्याच्या ६५० स्त्रोतांत फ्लोराईड, ८७६ स्त्रोत पिण्यासाठी अयोग्य

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ  :  जिल्ह्यातील दहा हजार पाण्याच्या स्त्रोतांपैकी सहा हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात पाच हजार 771 स्रोत पिण्यायोग्य असून, तब्बल 876 स्रोत पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 654 स्रोत फ्लोराईडयुक्त आढळले आहेत, तर 129 नमुने दीड टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दूषित आहेत. 

हेही वाचा - महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या...

जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची दोन टप्प्यांत तपासणी केली जाते. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूननंतर पाणी नमुने घेतले जातात. स्त्रोतांनुसार विविध रंग देण्यात येतो. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतांमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, फी, टर्ब आदी स्वरूपाचे प्रमाण आढळून येते. त्यामध्ये फ्लोराईड व नायट्रेटच्या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. त्यानुसार संबंधित स्त्रोतांवर उपाययोजना केल्या जातात. अन्यथा पिण्याच्या पाण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. मॉन्सूनपूर्व तपासणीत जिल्ह्यातील 10 हजार 689 पाण्याचे स्रोत आहेत. त्यातील पाच हजार 771 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर त्यातील 876 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. विशेष म्हणजे ह्यातील 654 स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले. तब्बल 129 स्त्रोतांमध्ये दीड टक्‍क्‍यापेक्षा अधिक फ्लोराईड असल्यामुळे अधिक धोका आहे. त्यात प्रामुख्याने नळयोजना, हातपंप, विहिरी आदी स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. फ्लोराईडचे पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. परंतु, उपाययोजना तोकड्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा - महिलेला अ‌ॅसिड फेकून ठार मारण्याची धमकी, अत्याचार...

जिल्ह्यातील 245 स्त्रोतांमध्ये नायट्रेट -
पाण्याच्या नमुन्यांमध्ये विविध प्रकारचे खनिज आढळून येत आहेत. त्यात फ्लाराइडसह आता नायट्रेटचे प्रमाणही स्त्रोतांमध्ये आढळून आले आहे. जिल्ह्यातील 245 स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जून महिन्यात घेण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत समोर आले आहेत. त्यात यवतमाळ तालुक्‍यात आठ, बाभूळगाव नऊ, दारव्हा चार, नेर 13, आर्णी 13, पुसद नऊ, दिग्रस दोन, उमरखेड चार, महागाव तीन, राळेगाव आठ, कळंब सात, केळापूर 73, घाटंजी 40, वणी 27, मारेगाव 11, झरी जामणी 14, असे 245 स्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आलेले आहेत.

हेही वाचा - अधिकारी, कंत्राटदाराने पाडला सौरदिव्यांचा 'उजेड...

फ्लोराईडचे दीड टक्‍क्‍यापेक्षा जास्त असलेले स्रोत -

 • यवतमाळ - 28
 • बाभूळगाव - 12
 • दारव्हा - 02
 • नेर - 12
 • आर्णी - 05
 • राळेगाव - 06
 • कळंब - 03
 • केळापूर - 19
 • घाटंजी - 14
 • वणी - 06
 • मारेगाव - 04
 • झरी जामणी - 18
   
loading image