दोषींना निलंबित करणार : मुख्यमंत्री फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीअंती प्रकरणातील दोषींना निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा आज विधानसभेत केली. 

मेडिकलमध्ये जेवणात शेणसदृश गोळा आढळल्याची दखल अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतली. गुरुवारी सकाळीच एफडीएचे पथक मेडिकलमध्ये धडकले. शेणसदृश गोळा जप्त केला. रुग्णाची पत्नी, रुग्ण तसेच आजूबाजूच्या नातेवाइकांची साक्ष नोंदवून घेतली. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. किचनची पाहणी केली. तूरडाळ, पालक डाळीचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडलेल्या या प्रकरणात किचन सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर हे प्रकरण शेकणार असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये रंगली आहे. 
चौकशी समिती गठित 
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशी समिती गठित केली. औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगेंद्र बनसोड, बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन, उपअधीक्षक डॉ. लांजेवार यांच्यासह डॉ. वैशाली वानखेडे यांचा या समितीत समावेश आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये उमेश पवार हा रुग्ण जेवण करीत असताना त्याच्या ताटात दुर्गंधीयुक्त शेणसदृश वस्तू दिसली. रुग्णाच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीत पालकाच्या डाळभाजीत ही वस्तू दिसल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. बनसोड यांनी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये निरोप दिला. परंतु, पहिल्या दिवशी गुरुवारी चौकशी समितीसमोर मुख्य साक्षीदार असलेल्या परिचारिका हजर झाल्या नाही. यामुळे चौकशीच्या कामाला शुक्रवार, 21 जून रोजी सुरुवात होईल. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food and Drug Administration in medical