नोटा लंपास करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

रामटेक  तालुक्‍यातील आमडी फाट्यावरील पेट्रोल पंपावरून दोन हजार रुपयांच्या 34 नोटा लंपास केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार इराणी नागरिकांना रामटेक पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे.

रामटेक -  तालुक्‍यातील आमडी फाट्यावरील पेट्रोल पंपावरून दोन हजार रुपयांच्या 34 नोटा लंपास केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार इराणी नागरिकांना रामटेक पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. काल मंगळवारी दोन इराणी नागरिकांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या एक महिला गरोदर असल्याने तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले आहे. एका अल्पवयीन आरोपीस बालन्यायालयासमोर हजर केले. 

सोमवारी, रामटेक ठाण्याअंतर्गत आमडी येथील भारत पेटोलियमच्या बीपी पेटोल पंपावर दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास कारने आलेल्या चार परदेशी इराणी नागरिकांपैकी दोन आरोपींनी पेट्रोल भरल्यानंतर चलन बदलून देण्याचा बहाणा करून व्यवस्थापकाजवळ असलेले 74 हजार रुपये हातचलाखीने लंपास केले. व्यवस्थापकाच्या तक्रारीवर आरोपींना देवलापार पोलिसांनी वाहीद हुसैन जादेह (वय 25), मोहम्मद रजा पोहंगे (वय 18) व वाहीदची पत्नी मोजगान रजा पोहंगे (वय 25) यासह एक अल्पवयीन आरोपी (सर्व रा. ताजरीश, जि. तेहरान, देश इराण) यांना मोठ्या शिताफीने अटक केली. 

त्यांची चौकशी करीत असताना मोजगान हिची प्रकृती बिघडल्याने तिला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सर्व आरोपींना रामटेक येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यास 18 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली, तर त्याची पत्नी मोजगान हिला आज नागपूरच्या शासकीय महिला वसतिगृहात तर तिचा भाऊ मोहम्मद रजा यास नागपूरच्या बाल न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास ठाणेदार दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सरकटे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. 

Web Title: Foreign citizens arrested in ramtek

टॅग्स