सेक्‍स रॅकेटमध्ये विदेशी तरुणी ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरुणींसह विदेशी तरुणींचा बोलबाला आहे. त्यामुळे दर महिन्यात आठ ते 10 विदेशी तरुणी देहव्यापारासाठी नागपुरात येतात.

नागपूर - नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरुणींसह विदेशी तरुणींचा बोलबाला आहे. त्यामुळे दर महिन्यात आठ ते 10 विदेशी तरुणी देहव्यापारासाठी नागपुरात येतात. पाचपावलीतील सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरुणींसह झारखंडमधील युवतीला ताब्यात घेतले. आरोपी दलाल मोहंमद सरफराज मेमन याला पोलिसांनी अटक केली. 

मोहंमद मेमन हा अनेक वर्षांपासून पाचपावलीतील मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ राय सोसायटीतील फ्लॅट क्र. 110 मध्ये सेक्‍स रॅकेट चालवीत होता. त्याच्या संपर्कात गुजरात, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, चेन्नई, ओडिशा, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांतील व विदेशी तरुणी संपर्कात आहेत. विदेशातील दलालांसोबत मोहंमदचे संबंध आहेत. त्याने दहा दिवसांपूर्वीच बांगलादेशच्या दोन तरुणींना तर छत्तीसडगमधील रायपूर येथील तरुणीला देहव्यापारासाठी नागपुरात आणले होते. 

"हायफाय' असलेल्या तिन्ही तरुणींसाठी नोटा उडविणाऱ्या आंबटशौकिनांची गर्दी होत होती. गुन्हे शाखेचे नीलेश भरणे यांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी खातरजमा केली. विदेशी युवती फ्लॅटमध्ये देहव्यापार करीत असल्याचे स्पष्ट होताच सोमवारी पंटर पाठवला व पाच हजारांत सौदा झाला. त्याला दोन बांगलादेशी व रायपूरची तरुणी दाखविण्यात आली. त्याने बांगलादेशी तरुणी पसंत केली. यानंतर मोहंमदने रूम उपलब्ध करून दिली. पंटरने दबा धरून असलेल्या पोलिसांना इशारा दिला. पोलिसांनी बांगलादेशीसह अन्य युवतीला ताब्यात घेतले. 

व्हॉट्‌सऍपवर फोटो 
तिन्ही तरुणींचे नागपुरात फोटोसेशन करण्यात आले. अर्धनग्नावस्थेतील फोटो आंबटशौकीन ग्राहकांना व्हॉट्‌सऍपवर पाठवून आकर्षित करण्यात येत होते. मोहंमदने हा फंडा दोन वर्षांपासून वापरत असल्याचे सांगितले. विदेशी तरुणींना विमानवारी करणे तसेच त्यांची पॉश "स्टार' हॉटेलमध्ये "सेटिग' करीत असल्याची कबुली मोहंमदने दिली.

Web Title: foreign woman arrested in a sex racket