वनविभाग, महावितरणची जंगलात गस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

धाबा (जि. चंद्रपूर) : जिवंत विद्युत तारांच्या वापराने वन्यजिवांची शिकार केली जाते. शिकारीसाठी पसरविलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन वाघ आणि मानवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिकारीचा हा प्रकार रोखण्यासाठी आता वनविभाग आणि महावितरणने संयुक्तपणे गस्त सुरू केली आहे.

जिल्ह्यातील घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा आवास आहे. वाघ, बिबट, अस्वल या हिंस्रपशूंसोबतच तृणभक्षक प्राण्यांचा मोठा वावर आहे. अशात जंगलात उभे असलेले विद्युत खांब वन्यजीवांच्या जिवावर उठले आहेत. या खांबावरील विद्युत प्रवाहाच्या वापराने वन्यजिवांची शिकार करण्याचा अघोरी प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. वन्यजीवांच्या भ्रमणमार्गावर लोखंडी तार पसरविली जाते. या तारांतून विद्युत प्रवाह सोडला जातो. या तारांना स्पर्श झाल्याने वन्यजीवांचा मृत्यू होतो. या प्रकाराने अनेक वन्यप्राण्यांसोबतच मानवांनाही जीव गमवावा लागला. त्यामुळे शिकाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी वनविभागाने सशक्त पाऊल उचलले आहे. आता वनविभाग आणि महावितरणने संयुक्त गस्त सुरू केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department, Mahavitaran's patrol in the forest