वाघाच्या मादी बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात

पिपरटोला जंगलात आपल्या आईपासून विलग होऊन एकाकी भटकणाऱ्या वाघाच्या मादी बछड्याला वनविभागाच्या चमुने ताब्यात घेतले.
forest department officer found female tiger calf gadchiroli
forest department officer found female tiger calf gadchirolisakal

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या पोर्ला वनपरीक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पिपरटोला जंगलात आपल्या आईपासून विलग होऊन एकाकी भटकणाऱ्या वाघाच्या मादी बछड्याला वनविभागाच्या चमुने ताब्यात घेतले.मागील काही दिवसांपासून वाघाचा एक बछडा जंगलात एकाकी फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती.

त्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, बेशुद्धीकरण बंदुकीचे नेमबाज अजय मराठे, जलद बचाव पथकाचे सदस्य अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल तिखट, सुनील नन्नावरे, अमोल कोरपे, चालक अक्षय दांडेकर यांच्या चमुने पिपरटोला जंगल परिसरात असलेल्या या वाघाच्या बछड्याला जाळे व शिल्डद्वारे जेरबंद केले.

हा वाघाचा मादी बछडा असून त्याचे वय ४-५ महिने आहे. हे मादी पिल्लू अतिशय अशक्त अवस्थेत वनक्षेत्रात आढळून आले. गंभीर निर्जलीकरण स्थितीमुळे ते दुर्बल होते. त्याला रविवार (ता. १५) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास पकडण्यात आले. प्राथमिक उपचार आणि तपासणी करण्यात आली. त्याला पुढील उपचार व देखभालीसाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. हे अभियान वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com