लाच घेण्याच्या मोहाने वनरक्षक अलगद पोलिसांच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

वनरक्षक तेजावत याने तक्रारदाराकडून जप्तीचा टँक्टर सोडवून देण्यासाठी चाळीस हजार रुपयाची मागणी केली  होती. त्यानंतर ३०हजारात समझोता झाला. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रर केली.

एटापल्ली,(जि.गडचिरोली) : जप्त केलेला टँक्टर सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने एटापल्ली येथील एका वनरक्षकाला रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी( ता.१२) सायंकाळी जिवनगट्टा गावात घडली.
 शुभाष तेजावत असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
 वनरक्षक तेजावत याने तक्रारदाराकडून जप्तीचा टँक्टर सोडवून देण्यासाठी चाळीस हजार रुपयाची मागणी केली  होती. त्यानंतर ३०हजारात समझोता झाला. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रर केली.

सविस्तर वाचा - नागपुरात तीन गर्भवती  महिलांना कोरोनाने ग्रासले
 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मा मार्गदर्शनाखाली पोलिस नाइक सतीश कत्तिवर, सुधाकर दंडीकवार, नवघरे, देवेंद्र लोनबले व पोलिस शिपायी महेश कुकुड़कर यानी  सापळा रचून वनरक्षक सुभाष तेजावत याला  जीवनगट्टा गावात रंगेहात पकडले. या प्रकरणी एटापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest guard traped taking bribe