
परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने माहिती मिळावी म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी अजूनही त्यांच्या निवासस्थाबाहेर प्रतीक्षा करीत आहेत.
यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेल्या १५ दिवसांपासून भूमिगत होते. पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर मंगळवारी प्रथम ते सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर येणार आहे. पोहोरागड येथे जाण्यासाठी निघाले आहे. त्यासाठी सरकारी ताफा त्यांच्या बंगल्यावर पोहोचला होता. तिन्ही शिवसेना जिल्हा प्रमुख त्यांच्या सोबत आहेत.
संजय राठोड गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळातच आपल्या निवासस्थानी मुक्कामी असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. आज ते सकाळी ११ वाजता पोहोरागड येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला आहे. वाटेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली आहे.