दहा सहायक वनसंरक्षकांची विभागीय वनाधिकारीपदी पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

नागपूर - भारतीय वन सेवेतील 40 वनाधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती झाल्यानंतर आता राज्य वन सेवेतील 10 सहायक वनसंरक्षकांना विभागीय वनाधिकारी या संवर्गात पदोन्नती देण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रसिद्धी व माहिती अधिकारी या रिक्त पदावर एस. पी. नाले यांची नियुक्ती झाली.

एस. एल. बिलोलीकर यांची विभागीय वनाधिकारी (दक्षता, गडचिरोली), तर एम. एस. ढेरे यांची उपसंचालक सामाजिक वनीकरण (नागपूर) या पदावर किशोर मिश्रीकोटकर सेवानिवृत झाल्याने रिक्त झालेल्या पदावर नेमणूक केली आहे. आर. के. चव्हाण यांची विभागीय वनाधिकारी वन्यजीव गोंदिया, बी. पी. ब्राह्मणे यांची विभागीय वनाधिकारी योजना गडचिरोली येथे पदोन्नतीनंतर पदस्थापना केली आहे. 2016-17 मधील विभागीय वनाधिकारी पदावर पदोन्नती निवड सूचित समाविष्ट करण्यात आलेल्या ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी अथवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रकरणाची सद्यःस्थिती सामान्य प्रशासन विभागाकडून तपासणी करून पदोन्नतीचा निर्णय घेणार आहे.
बदली झालेले अधिकारी आणि कंसात नियुक्तीचे ठिकाण - पी. के. बागूल (उपसंचालक, सामाजिक वनीकरण, बुलडाणा), एस. एम. दौड (विभागीय वनाधिकारी, मूल्यांकन, नाशिक), डी. एस. सावंत (उपसंचालक, सामाजिक वनीकरण, अलिबाग), एल. डी. नवले (उपसंचालक, सामाजिक वनीकरण, धुळे), पी. आर. मसूरकर (विभागीय वनाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली), एस. व्ही. काटकर (विभागीय वनाधिकारी, तेंदू, औरंगाबाद).

Web Title: forest security additional office promotion