वनकर्मचाऱ्यांचे आज राज्यस्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल.

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल.
कार्यक्रमाला वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मुंडे, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. यटबॉन, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक एम. आर. प्रवीण उपस्थित राहतील.
रविवारी सकाळी दहाला संघटनेचे अध्यक्ष किशोर पोहनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. सकाळी अकराला उद्‌घाटन सत्र होणार आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्याशी संवाद साधला जाईल. त्यानंतर संघटनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. लेखणी या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. आयोजनासाठी किशोर पोहनकर, प्रकाश गंटावार, श्रावण नन्नावरे, संजय मैंद, रमेश कोमलवार, विनोद वाटेकर, सुरावार, योगेश धकाते, अखिल राईंचवार, सीमा श्रीरामवार, सचिन साळवे, मोहन ठाकूर, संजय नेरलवार, दिलीप पुरमशेट्टीवार, चंदू बावनवाडे, उमाजी गोवर्धन, गोपाल खरवडे सहकार्य करीत आहेत.
1,400 कर्मचाऱ्यांचा सहभाग
राज्यातील कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, धुळे, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या अकरा वनवृत्तांतील सुमारे एक हजार 400 कर्मचारी सहभागी होणार आहेत.  

 

 

Web Title: Forest workers today's state convention