बांधकाम कामगारांच्या नोंदीसाठी बनावट स्वाक्षरी, शिक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अमरावती : बांधकाम कामगार म्हणून नोंद व्हावी, त्यासाठी आवश्‍यक दाखल्यावर शासकीय कंत्राटदाराची बनावट स्वाक्षरी व शिक्के मारून त्या अर्जाची प्रत्येकी 300 रुपयांमध्ये विक्री झाली.

अमरावती : बांधकाम कामगार म्हणून नोंद व्हावी, त्यासाठी आवश्‍यक दाखल्यावर शासकीय कंत्राटदाराची बनावट स्वाक्षरी व शिक्के मारून त्या अर्जाची प्रत्येकी 300 रुपयांमध्ये विक्री झाली.
खोलापूर ठाण्याच्या हद्दीत शिंगणापूर गावात हा प्रकार उघडकीस आला. शासकीय कंत्राटदार दिवाकर भगत यांच्या तक्रारीवरून खोलापूर ठाण्यात योगेश वडे (रा. शिंगणापूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बांधकाम कामगारांचे लाभार्थी म्हणून शासकीय कंत्राटदाराकडे नव्वद दिवस काम करण्याचा दाखला हवा असतो. त्या दाखल्यावर संतोष चव्हाण, अभियंता व शासकीय कंत्राटदार म्हणून शिक्के मारून योगेश वडे याने त्या मोबदल्यात प्रत्येकी तीनशे रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्री. भगत यांनी खोलापूर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. यापूर्वी अमरावती शहरात प्रशांतनगर परिसरातील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालय परिसरात फ्रेजरपुरा पोलिसांनी पाच जणांना अटक करून गुन्हे दाखल केले होते. त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचे दाखले पैसे घेऊन दिले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forged signatures, stamps for construction workers' records

टॅग्स