भाजपच्या माजी मंत्र्याला शिवीगाळ

मनोहर बोरकर
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

- तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन व्यापाऱ्यांकडून (ता.16) शुक्रवार पासून बाजारपेठ बंद ठेवली आहे.

- तर सुरु असलेल्या आंदोलन स्थळी समस्या जाणून निवारण करण्याच्या हेतुने गेलेल्या माजी मंत्री आमदार अमरीशराव आत्राम यांना आदिवासी विद्यार्थी संघटनाचे प्रज्वल नागुलवार व आदिवासी विद्यार्थी संघटना कार्यकर्त्यांकडून अपमानजनक शिविगाळ करण्यात आला.

एटापल्ली : तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन व्यापाऱ्यांकडून (ता.16) शुक्रवार पासून बाजारपेठ बंद ठेवली आहे. तर सुरु असलेल्या आंदोलन स्थळी समस्या जाणून निवारण करण्याच्या हेतुने गेलेल्या माजी मंत्री आमदार अमरीशराव आत्राम यांना आदिवासी विद्यार्थी संघटनाचे प्रज्वल नागुलवार व आदिवासी विद्यार्थी संघटना कार्यकर्त्यांकडून अपमानजनक शिविगाळ करण्यात आला. आशी तक्रार नगरसेवक विजय नल्लावार, नगरपंचायत गटनेता दीपक सोनटक्के व तालुका भाजप अध्यक्ष नवीन बाला यांनी केली आहे. 

गेल्या सहा दिवसांपासून व्यापारी संघटनाकडून भाजप आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करावे, बंद असलेली इंग्रजी माध्यमाची मॉडेल स्कूल सुरु करावे, दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारण्यात यावे, विद्युत बिलातील मीटर भाड़े व विज अधिभार कमी करण्यात यावे, एटापल्ली ते आलापल्ली रस्ता चौपदारी करावे व अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा अशा मागण्यांसाठी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन आंदोलन केले जात आहे.

सदर  मागण्यांची पूर्तता करण्यास वित्त आणि नियोजन मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आणि मागण्या मान्य केल्या शिवाय आंदोलन मागे घेतली जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे (ता.20) मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान अहेरी विधानसभा  सदस्य व राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजप आमदार राजे अमरीशराव आत्राम यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तर आंदोलकांशी चर्चा करीत असतांना प्रज्वल नागुलवार व काही आंदोलकांनी आमदार आत्राम यांचे विरुद्ध घोषनाबाजी करत अपमानजनक शिविगाळ केली होती. त्यामुळे नागुलवार व इतर आदिवासी विद्यार्थी संघटनां कार्यकर्त्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार भाजप अध्यक्ष नवीन बाला नगरसेवक विजय नल्लावार व नगरसेवक दीपक सोनटक्के यांनी केली. तर एटापल्ली पोलिसांनी चौकशीही सुरु केली आहे,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former BJP minister abused