माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Former Chief Minister Devendra Fadnavis letter to Chief Minister Udhav Thakare
Former Chief Minister Devendra Fadnavis letter to Chief Minister Udhav Thakare
Updated on

अमरावती : मेळघाटच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेता व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. शासकीय सेवेत असलेल्या महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे, ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला खचितच शोभादायक नाही. त्याअनुषंगाने महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट ऑफिसर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे आपण व्यक्तीशः लक्ष घालून उचित कारवाई करावी, अशी विनंती फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.

महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट ऑफिसर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्याआधारे ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट ऑफिसर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध खून व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून खटला चालवावा.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी या नियंत्रण अधिकाऱ्याला सहआरोपी करून अटक करावी व सेवेतून बडतर्फ करावे. वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. नामवंत विशेष सरकारी वकिलांची त्यासाठी नेमणूक करावी. शिवाय शिवकुमार आणि रेड्डी या दोघांची तत्काळ विभागीय चौकशी करावी, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com