माजी नगराध्यक्षाला दारूतस्करीत अटक

file photo
file photo

चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना दारू तस्करीत मंगळवारला पोलिसांनी अटक केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. जयस्वाल यांनी भाड्याने घेतलेल्या घरांच्या समोरील वाहनांमध्ये दारू ठेवलेली होती.
दारूबंदीपूर्वी दीपक जयस्वाल यांचा जिल्ह्यात दारूव्यवसाय होता. दारूबंदी नंतर दारू सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचे नेतृत्वही त्यांनीच केले. ते लिकर असोसिएशनचे सल्लागार आहेत. जयस्वाल यांच्याकडे दारूसाठा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांना मिळाली. नांदेडकर यांच्या निर्देशावरून पोलिस उपनिरीक्षक लाकडे यांच्या नेतृत्वात जयस्वाल यांच्या वडगाव येथील घरावर छापा टाकला.
ज्या घरी छापा टाकण्यात आला ते घर जयस्वाल यांनी भाड्याने घेतले आहे. जयस्वाल यांची वाहन तिथे ठेवलेली असतात. याच वाहनांमध्ये दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. झडतीमध्ये एका वाहनातून तब्बल 35 पेट्या देशी आणि 18 पेट्या विदेशी दारू व वाहन असा एकूण 15 लाख रुपयांचा ऐवज आणि दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत दीपक जयस्वालसह मयूर राजेश लहेरिया, राकेश चित्तुरवार या दोघांनाही अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com