Vidhan Sabha 2019 : मोदी असेपर्यंत तरुणांना नोकऱ्या नाहीत; राहुल गांधीची खरमरीत टीका

Vidhan Sabha 2019 : मोदी असेपर्यंत तरुणांना नोकऱ्या नाहीत; राहुल गांधीची खरमरीत टीका

विधानसभा 2019 
यवतमाळ - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. आज दुपारी यवतमाळ येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले.

भाषणात त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी याविषयांवर भर दिला. राहुल यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख पंतप्रधान मोदींवर होता. त्या मुद्द्याला जोडून राहुल यांनी महाराष्ट्रात या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलू शकते, असं म्हटलंय.  

राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण देश केवळ दहा पंधरा लोकांच्या हातात देण्याचे काम भाजपने केले आहे. जीएसटी आल्यानंतर सगळे छोटे व्यापारी बाजूला सरकले आणि आता केवळ मोठे उद्योगपतीच तग धरून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानी यांचे लाऊड स्पीकर आहेत. त्यांचे केवळ एकच काम आहे की, सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे. त्याशिवाय ते दुसरं काही करत नाहीत. भाजप सरकारने मनरेगा रद्द केले, आदिवासी कायदा बदलत आहेत. आज देशात नोटबंदीने फायदा झालेला एकही माणूस नाही. जीएसटीचा फायदा झालेला एकही व्यापारी नाही. छोटे छोटे सगळे व्यापारी देशोधडीला लागले आहेत. मुळात मोदी असेपर्यंत देशात तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. अर्थव्यवस्थेला अंबानी, अदानी चालवत नाहीत. गरीब शेतकरी, दुकानदार, मजूर, कामगार, हे चालवतात.'

देशातील परिस्थिती बिकट आहे. तुमच्याकडे एकच पर्याय आहे. महाराष्ट्रात परिस्थिती बदलू शकतो. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणा. आम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली. राहुल गांधी म्हणाले, 'तुमचे पाकिट मारून, पैसे अब्जाधीशांच्या खिशात घालत आहेत. जसा पाकिट मार, पाकिट मारण्यापूर्वी दुसरीकडं लक्ष वळवतो. तसंच तुमचं चाललंय. तुम्ही सावध व्हा. लोकसभा निवडणुकीत पुलवामाचा मुद्दा आला.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com