माजी उपमहापौर होले भाजपमधून निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटणारे माजी उपमहापौर सतीश होले यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली. यात होले यांचाही समावेश आहे. 

दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार मोहन मते यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करून माजी उपमहापौर सतीश होले यांनी खळबळ उडविली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील पक्षातील नेत्यांनीही त्यांची समजूत काढली; परंतु त्यांनाही होले यांचे बंड थंड करण्यात अपयश आले. या नेत्यांना न जुमानता उमेदवारी कायम ठेवत अधिकृत उमेदवार मोहन मते यांच्याविरुद्ध दंड थोपटत बंड पुकारल्याबाबत प्रदेशाध्यक्ष खासदार चंद्रकात पाटील यांनी सतीश होले यांना पक्षातून निलंबित केले. सतीश होले 2017 मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग 31 मधून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांना भाजपने मे 2016 मध्ये उपमहापौरपद दिले होते. परंतु, फेब्रुवारीत महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने त्यांना 10 महिनेच उपमहापौरपदाचा कार्यकाळ मिळाला. या पंचवार्षिक काळात त्यांना मोठ्या पदाची अपेक्षा होती; परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे ते भाजप नेत्यांवर नाराज होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Deputy Mayor Holle Suspended from BJP