Former Minister Subodh Savji's Demand
esakal
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच, बुलढाण्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत एक अजब मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांचे रक्त राज्यातील सर्व खातेप्रमुखांना द्यावे, असं ते म्हणाले.