esakal | मोठी बातमी : भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

former MP of wardha vijy mude expired

विजयराव मुडे हे अकराव्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. खासदार पद त्यांच्यासाठी केवळ १८ महिन्यासाठीच राहिले. या काळात अटलबिहारी वाजपयी यांचे सरकार होते.

मोठी बातमी : भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे निधन 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी घडली. विजयराव मुडे त्यांच्या आर्वी येथील निवासस्थानी असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. Video : खासदार

नवनीत राणा म्हणाल्या खूप वेदना झाल्या पण मी मरता मरता वाचली, कारण...

विजयराव मुडे हे अकराव्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. खासदार पद त्यांच्यासाठी केवळ १८ महिन्यासाठीच राहिले. या काळात अटलबिहारी वाजपयी यांचे सरकार होते.

यावेळी अटल बिहारी वाजपेयी केवळ १३ दिवसांचे पंतप्रधान राहिले. त्यानंतरच्या काळात १५ महिन्यातच सरकार कोसळले. या काळात त्यांनी वर्धेचे खासदारपद भूषविले. 

Good News : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकाराने एमपीएससी उमेदवारांना मिळणार ही मुभा...

तत्पूर्वी भाजपची सत्ता असताना विधान परिषदेवर त्यांना आमदार म्हणून नियुक्ती मिळाली होती. मात्र त्यांनी पदाचा राजीनामा देत खासदार पदाची निवडणूक लढविली. यात त्यांचा विजय झाला. भाजपचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षक परिषदेतही त्यांनी भाजपचे बरीच वर्षे नेतृत्व केले.

loading image