धारदार शस्त्राने वार अन्‌ दगडाने चेहरा केला विद्रूप, फक्त चार तास...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

जुन्या वैमन्यसातून एकाचा खून करण्यात आला. छातीवर, पोटावर, खांद्यावर व डोक्‍यावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा विद्रूप करण्यात आला. मात्र, चार तासांतच पोलिसांनी आरोपींना पकडून खून प्रकरणाचा छडा लावला. 

यवतमाळ : जांब रोडवरील वनविभागाच्या गार्डनच्या बाजूला गुरुवारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. त्याच्या छातीवर, पोटावर, खांद्यावर, डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्यात आले. मृताची ओळख पटू नये, म्हणून डोक्‍यावर दगड टाकून चेहरा विद्रूपही केला होता. मात्र, खूनप्रकरणातील संशयित आरोपींना अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने अवघ्या चार तासांत गजाआड केले. पूर्ववैमनस्यांतून तरुणाचा काटा काढल्याची माहिती आहे. 

रूपेश महेंद्र देशभ्रतार (वय 27, रा. गोवर्धनले ले-आउट, उमरसरा, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. अतुल सतीश ढाले (वय 20), स्वप्नील महादेव डोफे (वय 19), दिनेश कैलास इंगोले, अनिकेत उर्फ गोलू शंकर कांबळे (वय 19) अशी संशयितांची नावे आहेत. आणखी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा संशयितांत समावेश आहे. जांब रोडवरील वनविभागाच्या गार्डनच्या बाजूला गुरुवारी (ता. सात) रात्री आठ वाजता अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या छातीवर, पोटावर, खांद्यावर, डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्यात आले. मृताची ओळख पटू नये म्हणून डोक्‍यावर दगड टाकून चेहरा विद्रूप करण्यात आला होता.

कसं काय बुवा? - फुटपाथ दुकानदारच उभे झाले तुकाराम मुंढेंच्या विरोधात, वाचा काय झाले...

अवधतूवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगात फिरवून मृताची ओळख पटविली. याप्रकरणी सिद्धांत देशभ्रतार (वय 29) याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित तरुणांना अवघ्या चार तासांत चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, मीनल कोयल, अवधूतवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अजय आखरे, डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, परसराम अंभोरे, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, बबलू चव्हाण आदींनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गजभारे करीत आहेत. 

जाणून घ्या - बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

मृतावरही पोलिसांत गुन्हे नोंद

पूर्ववैमनस्यातून रूपेशचा खून केल्याची कबुली संशयित मारेकऱ्यांनी पोलिसांना दिली. मृत रूपेश हा हिस्ट्रिशिटर असून, त्याच्यावर पोलिसदप्तरी गुन्हे नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे उमरसरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four accused arrested in Yavatmal murder case