esakal | आयपीएल सट्टाप्रकरणात चौघांना अटक, अमरावती ते यवतमाळातील नेरपरसोपंतपर्यंत नेटवर्क
sakal

बोलून बातमी शोधा

Four arrested in IPL betting case in amravati

अमरावतीमधील शिरोळा ते यवतमाळमधील नेरपरसोपंत गावापर्यंत आयपीएल सट्ट्याचे नेटवर्क असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

आयपीएल सट्टाप्रकरणात चौघांना अटक, अमरावती ते यवतमाळातील नेरपरसोपंतपर्यंत नेटवर्क

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : शहरालगत असलेल्या शिराळा गावापासून सुरू झालेले आयपीएल सट्ट्याचे धागेदोरे यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत गावापर्यंत जुळलेले असल्याची बाब उघडकीस आली आहे. शुक्रवारी (ता. दोन) रात्री क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली.

हेही वाचा -  चंद्रपुरातील 'जम्बो'चा गाशा गुंडाळणार, भाजप नेत्याच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांची...

सचिन सुभाष नावंदर(वय 40), आशीष गणेश शेलोरकर(वय 30), अमोल ऊर्फ अतुल मोहोड (तिघेही रा. शिराळा), शुभम प्रकाश जयस्वाल (वय 25, रा. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ), अशी अटक चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. जयस्वाल याला गुन्हे शाखेच्या पथकाने नेरपरसोपंत येथून ताब्यात घेतले. शिराळा येथील दोघे गावात, तर एक अमरावती शहरात राहतो. त्यापैकी एकाचे गावात किराणा दुकान आहे. शुक्रवारी (ता. दोन) आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज व सनराईज या दोन संघामध्ये सामना सुरू होता. आधी पोलिसांनी किराणा दुकानातील आयपीएल सामन्याच्या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधणाऱ्यांची नावे लिहून घेतली. प्रकरणी संबंधित दुकानदाराला आधी अटक केली. त्यानंतर गावातील दुसऱ्याला अटक केली. 

हेही वाचा - सामान्यांना लुबाडण्याचा नवीन फंडा; वाहनासमोर पडून...

शिराळा येथील दोघे घेतलेल्या सट्ट्याची माहिती अमरावतीत राहणाऱ्या आपल्या साथीदाराला द्यायचे. हा व्यक्ती पुढील आकडेमोडीची माहिती यवतमाळ जिल्ह्यात नेरपरसोपंत येथील आपल्या तिसऱ्या साथीदारापर्यंत पोहोचवित होता. नेरपरसोपंत येथील जयस्वाल हा पुढे क्रिकेट सट्ट्याची आकडेमोड कुणाला देत होता याबाबतची माहिती त्याने पोलिसांनादेखील दिली नव्हती. घटनास्थळावरून एक एलईडी, 15 हजार 980 रुपयांची रोख रक्कम, सहा मोबाईल, सेटटॉप बॉक्‍स, अशी 81 हजार 840 रुपयांची सामग्री जप्त केली. चौघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये वलगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image