esakal | नाशिक वरून पायी चालत आले अन् ते चार जण या शहरात झाले क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

corona .jpg

कोरोना विषाणू संकट काळात संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. यामध्ये कुणीही जिल्हा बाहेर जाऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून आंतर जिल्हा चेक पोस्ट लावण्यात आले आहे.

नाशिक वरून पायी चालत आले अन् ते चार जण या शहरात झाले क्वारंटाईन

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : नाशिकवरून अकोट तालुक्यात जाणाऱ्या चार लोकांना 23 एप्रिल रोजी सोनाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत संग्रामपूर तहसीलदार यांना माहिती दिल्यावर त्या चारही जणांना 24 एप्रिल रोजी बावनबीर येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणू संकट काळात संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. यामध्ये कुणीही जिल्हा बाहेर जाऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून आंतर जिल्हा चेक पोस्ट लावण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशनकडून सगोडा फाट्यावर अकोला जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट लावले आहे. 23 एप्रिलचे दुपारी याच चेक पोस्टवर जीवनावश्यक वस्तूचे वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी थांबविले.

महत्त्वाची बातमी - काय म्हणता? आपत्तीचे रुपांतर केले इष्टापत्तीत! वाचा कसे...

सदर वाहन क्रमांक एम. एच. ३० बीडी 2438 मध्ये गव्हाचे कट्टे होते. हे वाहन गहू घेऊन अकोटकडे जात होते. त्या गव्हाच्या कट्ट्यावर चार व्यक्ती कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांना चेकिंग दरम्यान बसलेले दिसून आले. त्यामध्ये किशोर दहीकर (वय 27, रा. धोडाकर ता. तेल्हारा), राजेंद्र टोटे (वय 18, रा. चिंचपाणी ता अकोट), कैलास टोटे (वय 18, रा. चिंचपाणी ता अकोट), विलास टोटे (वय 22, रा. चिंचपाणी ता. अकोट) यांचा समावेश आहे. या चारही जणांना पोलिसांनी विचारपूस केली. 

हेही वाचा - Video : ‘कोरोना’त मद्यपींचे वांदे झाल्याने घडतायेत असे धक्कादायक प्रकार?
 

नाशिक येथे करतात मजुरी काम
त्यामध्ये सर्व जण नाशिक येथे मजुरी काम करतात. लॉकडाउनचे काळात ते नाशिक वरून पायी चालत आले. सोनाळा गावा नजीक त्यांना हे वाहन भेटले. या वाहनातून अकोटला ते जात होते. त्यांचे जवळ एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता आवश्यक कोणताही परवाना नव्हता. म्हणून सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांनी या व्यक्तींची माहिती तहसीलदार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे दिली. त्यावरून चारही जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

एकूण सात लोकांना क्वारंटाईन
चार व्यक्ती अकोला जिल्ह्यात जाताना सगोडा पोलिस चेक पोस्टवर पोलिसांना दिसून आले. त्यांची माहिती मिळताच 24 एप्रिल रोजी त्यांना बावनबीर येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण सात लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये बावनबीर येथील पती-पत्नी व कळमखेड येथील एक जण आणि हे चार असे सात लोकांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासन काळजी घेऊन आहे.
- समाधान राठोड, तहसीलदार, संग्रामपूर

loading image