
गंभीर जखमी झालेल्या मजुरांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. भल्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
आर्णी (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन सुरू झाला आहे. यामुळे अनेक मजूर परराज्यात अडकले आहेत. या मजुरांना सरकारच्या वतीने त्यांच्या राज्यात सोडण्यात येत आहेत. सोलापूरवरून मजुरांना घेऊन एसटी यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने येत होती. वाटेत आर्णी माहुर रोडवरील कोळवन येथे एसटीने टिप्परला मागून जोरदार धडक दिली. यात चालकासह तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर आळ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.
लॉकडाउनमुळे अनेक मजुरांना आपापल्या गावी जाता आले नाही. परराज्यात ते अडकून पडले आहेत. यामुळे ते पायी किंवा वाट्टेल त्या मार्गाने गावाच्या दिशेने निघाले आहेत. राज्य सरकारने मजुरांना आहे त्या ठिकाणीच थांबा तुमची सोय करण्यात येईल असे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी घरी जाण्याचाच निर्णय घेतल्याने पायीच निघाले. राज्यभरातील ही स्थिती पाहून सरकारनेच मजुरांना गावी सोडण्याचा निर्णय घेतला.
जाणून घ्या - पत्नी बनली रणचंडिका; पतीच्या प्रेयसीला धु..धु धुतले... वाचा काय झाले ते
यासाठी एसटीचा वापर करण्यात येत आहे. मंगळवारी उत्तरप्रदेश व झारखंड येथे राहणाऱ्या मजुरांना घेऊन एसटी सोलापूरवरून निघाली. ही एसटी यवतमाळ येथून नागपूरच्या दिेशेने येत होती. मजुरांना नागपुरात रेल्वे स्टेशनवर सोडण्यात येणार होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. आर्णी माहुर रोडवरील कोळवन येथे एसटीने टिप्परला मागून जोरदार धडक दिली. यात चालकासह तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर आळ मजूर गंभीर जखमी झाले. तसेच 24 मजूर जखमी आहेत.
गंभीर जखमी झालेल्या मजुरांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. भल्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांनी लॉजमध्ये पकडले एका जोडप्याला, अन् मग झाले असे की...
पहाटे एसटी मजुरांना घेऊन जात होती. आर्णी माहुर रोडवरील कोळवन येथून टिप्परही जात होता. यावेळी मागून आलेल्या एसटीने टिपरला धडक दिली. यात एसटीचा समारेचा भाग चेंदामेंदा झाला. यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. क्रेनच्या सहाय्याने एसटीला बाजूला करण्यात आले.